Sunday, February 23, 2014

मराठी कविता - Marathi Poetry

Marathi Poetry


मराठी प्रेम कविता 

आता तुम्ही समजदार झाले असाल.
सर्व साधारण आयुष्यातील अनन्यसाधारण अडचणींवर मात 
केल्यामुळे आपला आत्मविश्वास प्रसरण पावला असेल.
सहाजिकच भुतकाळ म्हणजे काय हा प्रश्न? नव्याने निर्माण 

झालाही असेल एव्हाना - पण असो..
त्याचा काही उपयोग आहे का? आता..



************************************************************

मराठी कविता 


तुझ्या दिलेल्या वचनांचे
एक एक काळे मणी
अंतरात जपून
ठेवले आहेत .......!
तूला आठवतही नसेल आता
पण एकत्र घेतलेल्या अगणित
श्वासांची शपथ.....!
तुझ्या बरोबर चालेल्या
प्रत्येक पावलात सप्तपदींचे
मंत्र जपत होते......!
तू परतणार नाहीस
तरीही
तुझ्या नावानेच
आयुष्याचा उत्सव साजरा
करणार आहे...!
तू नसतांना ... पण तरीही
कुठेतरी तुलाच शोधतांना
अंतरगाभा-यात प्राण तेवत
आहे...!


************************************************************

प्रेम कविता 


मनातले सारे काही 
सांगण्यासाठी समोर 
मनासारखा माणूस 
असावा लागतो …
येवढे असुनही 
चालत नाही 
त्या माणसालाही 
मन असावं लागत ....... 

************************************************************

आठवण 

पावसाची सर आता नुकतीच बरसली 
आणि आठवणींची पाउलवाट  पुन्हा एकदा हिरवळली ........ 

************************************************************


Enjoy Marathi Kavita

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...